Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कु. भैरवी साळवे हिची योग समितीच्या युवती प्रभारी पदावर नियुक्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - महिला पतंजली योग समिती राजुरा च्या वतीने राजुरा युवती प्रभारी पदावरती कुमारी भैरवी प्रशांत साळवे हिच...
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
महिला पतंजली योग समिती राजुरा च्या वतीने राजुरा युवती प्रभारी पदावरती कुमारी भैरवी प्रशांत साळवे हिची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महिला पतंजलि योग समितिच्या राज्य सहप्रभारी संजीवनीताई माने तसेच स्मीताताई रेबनकर, महिला पतंजलि योग समितिच्या जिल्हा प्रभारी यांच्या सहमतीने करण्यात आली. या पदी नियुक्त झाल्याबद्दल पतंजली योग समिती सह प्रभारी एम.के. शेलोटे, भारत स्वाभिमान संघटन चे प्रभारी पी.एस. उराडे, महिला पतंजली तालुका प्रभारी अँड. मेघा धोटे, वर्किंग कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक हरिभाऊ डोर्लीकर यांच्या अनुमतीने ही नियुक्ती करण्यात आली. भैरवी ही फायनान्स मध्ये एमबीए असून ती उत्कृष्ट योगसाधिका आहे. तिच्या नियुक्तीचे सहप्रभारी पुष्पा गिरटकर, संघटन मंत्री भावना भोयर, किसान सेवा समिती सत्यपाल साळवे, मीडीया प्रभारी कृतीका सोनटक्के यांच्या व्यतिरिक्त योग शिक्षक, योग साधकांनी तिला शुभेच्छा दिल्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top