Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गरिबीला कंटाळून मजुराची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील घटना अविनाश रामटेके -  आमचा विदर्भ प्रतिनिधी विरुर स्टेशन - घरात अठरा विश्व दारिद्र्य, कुठलाही रोजगार ...
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील घटना
अविनाश रामटेके -  आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टेशन -
घरात अठरा विश्व दारिद्र्य, कुठलाही रोजगार नाही, मुलाला शिकवायचं काय व संगोपन करायचं कसं हे ठाम प्रश्न उभे असताना त्यातच पत्नी कानाने बधिर व पोटाच्यान आजराने स्वतः त्रस्त त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एका 55 वर्षीय मजुरांने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा  संपविल्याची घटना विरूर स्टेशन येथे घडली. 
सविस्तर असे की, राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील आनंदराव तुकाराम उपरे वय 55 वर्ष हा फुकटनगर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत होता तो गावात क्वचित मिळत असलेल्या रोजगार हमी कामावर जात असे त्यावर आपल्या संसाराचा गाढा चालवीत होता मात्र त्याची तब्येयत काही दिवसांपासून बरी नव्हती घरात नवा पैसे नाही त्यामुळे महागडं उपचार शक्य नव्हते तेव्हा वार्डातील काही लोकांनी पैसे गोळा करून त्याचा औषोधोपचार  केला मात्र आता हाताला काम नाही आणि दोन छोटी-छोटी मुले व पत्नी ही कानांनी बधिर याच विवेचनात येऊन काल रात्रौ दहा वाजताच्या सुमारास घरीच गडफास घेऊन त्याने आपली जीवन यात्रा संपविली. सदर घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर आता अधिकच संकट ओढलाय त्यामुळे विवेचनात सापडलेल्या या उपरे कुटुंबाला स्वतःचे घर नाही, शेती नाही व कुठला रोजगार ही नाही त्यामुळे हे कुटुंब कसे जगेल या विषयी नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे 
घटनेची माहिती विरुर पोलोस स्टेशनला मिळताच ठाणेदार राहुल चव्हाण व त्यांचे सहकारी घटनेस्थळी पोहचून पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूचे नोंद करून मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्या आले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top