Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात पुन्‍हा एकदा भाजपाचा झेंडा फडकेल - केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांचा विश्‍वास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामहित वर्मा या हमालाच्‍या घरी श्री. पुरी यांनी घेतला भोजनाचा आस्‍वाद श्री. पुरी यांनी सैनिक शाळेला दिली भेट, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ...
रामहित वर्मा या हमालाच्‍या घरी श्री. पुरी यांनी घेतला भोजनाचा आस्‍वाद
श्री. पुरी यांनी सैनिक शाळेला दिली भेट, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे केले अभिनंदन व कौतुक
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्‍या ८ वर्षात लोकहिताच्‍या विविध योजना राबविल्‍या. यात गरीब कल्‍याणाच्‍या योजनांवर त्‍यांनी विशेष भर दिला आहे. तळागाळातील सामान्‍य माणसाच्‍या चेह-यावर आनंद फुलावा, शेतकरी समृध्‍द व्‍हावा यासाठी मोदीजींनी अनेक निर्णय देखील घेतले. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात येत्‍या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा विजयी झेंडा पुन्‍हा एकदा फडकेल, असा विश्‍वास भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री श्री. हरदीपसिंह पुरी यांनी व्‍यक्‍त केला.
बल्‍लारपूर येथे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राच्‍या संघटनात्‍मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना संबोधताना केंद्रीय केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी बोलत होते. यावेळी राज्‍याचे वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेश बकाने, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्‍हेरी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी श्री. हरदीपसिंह पुरी यांनी जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, नगरसेवक, सरपंच यांच्‍याशी संवाद साधला. तत्‍पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयांना त्‍यांनी मालार्पण करत अभिवादन केले. यादरम्‍यान तिलक वार्ड बल्‍लारपूर येथील श्री रामहित वर्मा या हमाल काम करणा-या व्‍यक्‍तीच्‍या घरी श्री पुरी यांनी भोजनाचा आस्‍वाद घेतला व त्‍यांच्‍याशी खेळीमेळीच्‍या वातावरणात संवाद साधला. यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार, श्री. हंसराज अहीर यांच्‍यासह प्रमुख पदाधिका-यांनी देखील भोजन केले. वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. रामहित वर्मा यांच्‍या कुटूंबियांना दहा हजार रू. किंमतीचा कुकींग सेट भेट दिला. बल्‍लारपूर येथील खांडक्‍या बलाळशाह या गोंडराज्‍याच्‍या समाधी स्‍थळी भेट देत श्री. पुरी यांनी अभिवादन केले.
देशातील अत्‍याधुनिक अश्‍या सैनिक शाळेला श्री. हरदीपसिंह पुरी यांनी भेट दिली व पाहणी केली. या सैनिक शाळेचे एकुणच स्‍वरूप भव्‍य व नेत्रदीपक असून देशाच्‍या संरक्षणाच्‍या प्रक्रियेत ही सैनिक शाळा मैलाचा दगड ठरणार असल्‍याचे प्रतिपादन श्री. पुरी यांनी केले. या सैनिक शाळेच्‍या निर्मीतीसाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे त्‍यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top