Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तलाठी व कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता मागितली होती लाच डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - आजीच्या मृत्युनंतर आजीचे...
सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता मागितली होती लाच
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथील सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथील सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता धाबा साजा क्र.१७ चे तलाठी यांनी लाचेची मागणी केली व कोतवाल यांचे मार्फतीने दोन हजाराची लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील तक्रारदार तक्रारदार यांचे आजीचे नावांनी मौजा धाबा येथील शेत सर्व्हे नं १४३/२ मध्ये ०.८१ हे.आर व मौजा कोंढाणा येथील शेत सर्व्हे नं २४ मध्ये ०.५२ हे.आर. शेती जमीन होती. दिनांक ०२/०५/२०२१ रोजी तक्रारदाराची आजी मरण पावली. तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथील सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथील सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता चार हजार रुपयाची लाच मागत असल्याबाबत तक्रारदार यांनी मोबाईल अॅप व्दारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ऑनलाईन complaint@acbmaharastra.net वर तक्रार नोंदविली. मिळालेल्या तक्रारीवरून दिनांक २६/०९/२०२२ रोजी गै.अ.ओंकार भदाडे, तलाठी, तलाठी कार्यालय धाबा, साजा क्र. १७ यांचेविरूध्द पडताळणी कार्यवाही केली असता तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथिल सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथील सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता तडजोडीअंती दोन हजार रुपयाची मागणी केली. दिनांक २८/०९/२०२२ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान गै.अ. ओंकार संजय भदाडे, तलाठी, धाबा साजा क्र.१७ यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करुन गै अ.चंद्रकांत नेमचंद मुंजेकर, कोतवाल यांचे मार्फतीने लाचरक्कम स्विकारल्याने ओंकार संजय भदाडे, तलाठी, धाबा साजा क्र. १७ व गै.अ. चंद्रकांत नेमचंद मुंजेकर, कोतवाल, तलाठी कार्यालय धाबा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही ला.प्र.वि. नागपुर पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते तसेच पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. संदेश वाघमारे, पो.अ. राकेश जांभुळकर, म.पो.अ. पु पा काचोळे, व चालक पो.अ.सतिश सिडाम ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे. यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top