Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ओव्हरलोड कोळशाची वाहतूक व रस्त्यातील खड्यामुळे तरुणीचा जीव गेला-दुसरी गंभीर जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा ते सास्ती व राजुरा ते गोवरी मार्गाची दुरावस्था धोपटाला जवळ झालेल्या अपघाताने आतातरी प्रशासन डोळे उघडणार काय - रमेशभाऊ झाडे आमचा विदर्...
राजुरा ते सास्ती व राजुरा ते गोवरी मार्गाची दुरावस्था
धोपटाला जवळ झालेल्या अपघाताने आतातरी प्रशासन डोळे उघडणार काय - रमेशभाऊ झाडे
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा ते सास्ती व राजुरा ते गोवरी या मार्गावर वेकोलिच्या कोळश्या खदानीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहे. मागील अनेक महिन्यांपासून रामपुरातील संतप्त नागरिक आंदोलने करीत आहे. कट्टर शिवसैनिक व रामपूरचे ग्राम पंचायत सदस्य रमेशभाऊ झाडे यांनी अनेकदा प्रशासनाला तंबीही दिली होती. रस्त्यावर येऊन संतप्त तरुणांनी अनेकदा टायर जाळून लक्ष वेधून घेतले होते मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केले, परिणामी बुधवार दि. २८ सप्टेंबरच्या सायंकाळी ओव्हरलोड कोळशाची वाहतूक व रस्त्यातील खड्यामुळे एका तरुणीला जीव गमवावा लागला तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली. 
मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका विठ्ठल बोबडे वय-20 वर्ष रा. राजुरा हि विद्यार्थिनी व तिची मैत्रीण प्रणीता बंडु सोनेकर वय-20 वर्ष रा. रामपुर हिचेसह दुचाकी क्र MH-34 AG-0050 ने चंद्रपूरहून राजुराकडे सास्ती मार्गे येत होती. प्रियंका बोबडे ही गाडी चालवत होती तर प्रणीता सोनेकर हि मागे बसून होती. सास्ती मार्गे येत असताना धोपटाला जवळील मंदिराजवळ राजुराकडे जाणारा ट्रक क्रं. MH-40Ak-3125 बेजवाबदारपणे दुचाकीच्या समोर जात असताना ट्रक चालकाने जोराने दुचाकीच्या समोर आणत ट्रक चालविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ट्रक चा समोरील टायर दुचाकीला लागल्याने दोन्ही तरुणी दुचाकीवरून खाली पडल्या त्यात मागे बसलेली प्रणीता सोनेकर हिच्या पोटाला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर प्रियंका बोबडे हिच्या पायाला दुखापत झाली. तरुणींना लागलीच लोकांनी रुग्णालयात उपचारार्थ पाठविले व पोलिसांना माहिती दिली. पोलिसानी घटनास्थळ गाठून ट्रक चालक मनोज रामचंद्र खैरे रा. रमाबाई वॉर्ड राजुरा यास ताब्यात घेतले. पोलिसांनी भादंवि १८६० कलम २७९,३०४अ, ३३७, २८४ अन्वये गुन्हा नोंद केला असून समोरील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top