Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूरात "नागपूर कराराची" होळी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विदर्भवाद्यांनी केले प्रदर्शन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - आज बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी गडचांदूर येथील डॉ. बाबासाहे...
विदर्भवाद्यांनी केले प्रदर्शन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आज बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी गडचांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर जिल्हा परिषदेचे माजी सभापती निलकंठराव कोरांगे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी गडचांदुर येथिल नागरिकानी प्रदर्शन करून "नागपूर कराराची" होळी करण्यात 
या प्रदर्शन दरम्यान उपस्थित विदर्भवाद्यांतर्फे "वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, विदर्भ आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा" सारख्या अनेक घोषणा देत विदर्भाची मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती निलकंठराव कोरांगे, पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र गोखरे, गडचांदूर शहर शेतकरी संघटना सरचिटणीस संतोष पटकोटवार, जेष्ट नेते शेख खाजा भाई, मनोहर चटप, विकास दिवे, बाळकृष्ण काकडे, गोसाई पाचभाई, वासूदेव गौरकार, सूरेश नवले, होमदेव आवारी, वासूदेव जेनेकर, नरेश सातपूते, सोनूले महाराज, ऊद्धव जिवतोडे, मोरेश्वर जेनेकर यांच्यासह अनेक विदर्भवादी नागरिक उपस्थिती होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top