Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" मोहिमे अंतर्गत ग्रा...
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
"माता सुरक्षित तर घर सुरक्षित" मोहिमे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे 30 सप्टेंबर 2022 ला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गरोदर मातांची तज्ञा मार्फत तपासणी करण्यात येत असून रुग्णसेवा सोनोग्राफी सेंटर गडचांदुर येथे मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा व इतर गरोदर मातांना प्रवृत्त करावे व रुग्णालयात आणण्यास सहकार्य करावे अशी विनंती व्यवस्थापन समिती ग्रामीण रुग्णालय गडचांदूर ने केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top