Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्रापं सार्वत्रिक निवडणुकांचे नामनिर्देशन ऑफलाईन पद्धतिने स्विकारावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडे मागणी आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - जानेवारी २०२१ ते सप्टेंबर...
आमदार सुभाष धोटे यांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडे मागणी
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन पत्र भरावयाची अखेरची तारीख दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. राजुरा मतदार संघात जिवती २९ कोरपना- २५ व राजुरा ३० ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक होणार असून तिन्ही तालुके डोंगराळ, अतिदुर्गम, नक्षल प्रभावित असल्याने अनेकदा नेटर्वक अभावी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारी बँकेची व इतर कार्यालयीन कामे एक एक आठवडा पडलेली असतात त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीस सदस्य व थेट सरपंच पदाकरीता संगणक प्रणाली दवारे ऑनलाईन नामनिर्देशन पत्र वेळेत सादर करणे शक्य होणार नाही. यामुळे निवडणुक लढविणारे ईच्छुक उमेद्वार निवडणुकीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अतिदुर्गम भागातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे नामनिर्देशन पत्र आँफलाईन पद्धतीने स्वीकारावे अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांना केल्या आहेत. 
राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील ग्रामपंचयात सर्वत्रीक निवडणुका सन २०२२ या कालावाधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आनलाईन नामनिर्देशन सुरू आहेत. या प्रणालीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आँफलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top