Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिप उच्च प्राथमिक शाळा सिंधीचा 'मोहित' राज्यस्तरावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'इको फ्रेंडली कटर' या प्रतिकृतीत आला प्रथम क्रमांक आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी राजुरा - दि. 10 ते 15 सप्टे. 2022 दरम्यान झालेल्या...
'इको फ्रेंडली कटर' या प्रतिकृतीत आला प्रथम क्रमांक
आमचा विदर्भ - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
दि. 10 ते 15 सप्टे. 2022 दरम्यान झालेल्या (ऑन लाईन) 59व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभाग आदिवासी गटातून जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा पंस राजुरा चा विद्यार्थी मोहित विजय वडस्कर याचा 'इको फ्रेंडली कटर' या प्रतिकृतीचा प्रथम क्रमांक आला आहे. आता तो राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मोहितला शाळेतील विज्ञान शिक्षिका रंजीता चापले, मुख्याध्यापक साईकृष्ण बुजोने, विरेनकुमार खोब्रागडे, गणपत चव्हाण, श्वेता माकोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
मोहितच्या यशाबद्दल राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, गट शिक्षण अधिकारी मनोजकुमार गौरकार, विस्तार अधिकारी संजय हेडाऊ, केंद्र प्रमुख केवलदास तोडे यांनी मोहित चे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top