Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे गलथान कारभार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बिबी गावालगत सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीची कोंडी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिध...
बिबी गावालगत सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीची कोंडी
पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
गडचांदुर -
सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदुर यांच्या हद्दीत गडचांदुर ते नांदा फाटा रोडवर बिबी गावाजवळ फुटलेल्या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदून नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. पर्यायी रस्त्याची पुर्नोचित व्यवस्था न केल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे बिबी लगत रस्त्यावर 3 ते 4 किमी लांब जाम लागत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.
मागील काही दिवसापूर्वी मनसे ने शेतकरी संघटनेच्या समर्थनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून रस्त्यावरील पूर्ण खड्डे भरणे आणि गडचांदुर ते नांदा फाटा मंजूर झालेले काम लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनंतर सा.बां. विभागाने लगेच बंद पडलेल्या कामाला बिबी गावाजवळून सुरुवात केली. एक बाजूचा रस्ता पूर्णपणे खोदून सिमेंट रोड बनविण्याचे काम चंद्रपूर येथील एक प्रतिष्ठित कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरू केले आहे. परंतु पूर्ण वाहतूक फक्त एका बाजूने सुरू करण्यापूर्वी त्या बाजूचे खड्डे भरून, व्यवस्थित पणे पर्यायी रस्त्याची व्यवस्था न करता सरळ एका बाजूने कामाला सुरुवात केली.
दोन्ही बाजूची पूर्ण वाहतूक एकच सिंगल रोडवरून निघणे कठीण झाले आहे व त्यामुळे बिबी गावाजवळ अनेक वेळा 4 ते 5 किमी चे जाम लागल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहतूक सुरू असलेल्या सिंगल रस्त्यावर ही मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि त्या रस्त्याचे साईड बरमच्या खड्डयात पाणी भरून पूर्णपणे चीखलमय झाले आहे. मोठ्या वाहनांच्या गर्दीत लहान दुचाकी वाहन चालकांना मधातून आपले वाहन काढणे कठीण झाले आहे. खड्डे पडून गाडण झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याची भीतीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे वाहतूक सुरू असलेल्या बाजूचे खड्डे भरून व चीखलमय झालेल्या साईड बरम वर गिट्टी, मुरूम टाकुन यथोचित पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
दोन दिवसापूर्वी CCR च्या ऑफिसजवळ CRC कंपनीचा हायवा साईडबरम व्यवस्थित नसल्याने रस्त्यात फसला व पलटी होता होता वाचला. मोठ्या प्रयत्नाने डोझरच्या सहाय्याने फसलेल्या हायवा ला काढण्यात आले. रोडवरील साईडबरम मध्ये खड्डे पडून 3-4 दिवसापासून पाणी भरलेले आहे. एक-दोन मजूर लावून कमीत कमी साईडबरम चे पाणी तरी बाहेर काढण्याचे काम सा.बां. विभागातील अधिकारी करून घ्यायला तयार नाही. त्यामुळे रास्ता आणखीन वेगाने फुटून जात आहे. सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदाराने या समस्येकडे लक्ष देऊन सुरळीत आणि रुंद पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्याची मागणी स्थानीय लोकांकडून व वाहनचालकां कडून केल्या जात आहे.
पाऊस झाल्याने वाहतूक सुरू असलेल्या एक बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. मोठा जाम लागणार नाही याच्यासाठी काळजी घेत लवकरच ते खड्डे भरून वाहतूक व्यवस्थित करू
- संदीप सुधेवाड, कनिष्ठ अभियंता, साबां विभाग गडचांदुर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top