Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धामणपेट येथें अतिसाराची लागण : पांच रुग्ण दगावले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धामणपेट येथें अतिसाराची लागण : पांच रुग्ण दगावले आमदार धोटेनी घेतली दखल : आरोग्य विभागाला आली जाग आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क गोंडपिपरी - धा...
धामणपेट येथें अतिसाराची लागण : पांच रुग्ण दगावले
आमदार धोटेनी घेतली दखल : आरोग्य विभागाला आली जाग
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी -
धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षितपणामुळे धामनपेट गावात अतिसाराची लागण झाली असून आतापर्यंत आठ दिवसात पाच नागरिक दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारा करीता २० रुग्ण ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. विमल नेवारे ५०, अनुसया सरवर ४८, बयाबाई चिताडे ६०, गंगाराम मडावी ५०, बापूजी धुडसे ६५ असे मृतकाचे नाव असून सर्व धामणपेट येथील रहिवासी आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील वटराणा गट ग्रामपंचायत मध्ये धामनपेट गाव येत असून ह्या गावची लोकसंख्या ३५० आहे. गोंडपिपरी पासून ३ किमी अंतरावर हे गाव आहे. इथं ग्रामीण रुग्णालये आहेत. या गावात अतिसाराची लागण झाली असून सुद्धा आरोग्य विभागाने कोणतीच दाखल न घेतल्याने या गावात आठ दिवसात आठ रुग्ण दगावले आहे. वीस रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तरी पण धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राने या गावाकडे पाठ फिरवल्याने येथिल नागरिक संतप्त झाले आहे. गावकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांना माहिती दिली असता क्षणाचाही विलंब न करता  आमदारांनी जिल्हाधिकारी अजय गुलहाने यांचेशी संपर्क करून त्या गावात आरोग्य कॅम्प लावण्याचे निर्देश दिले. घटनेची माहिती मिळताच स्वता धामणगाव गाठून तेथील नागरिकांची विचारपूस करून मृतकांच्या कुटूंबियाचे सांत्वन केले. यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत, उपजिल्हाधिकारी कर्डीले, जिल्हा शल्यचिकित्सक राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत, उपमुख्यकार्यपलन अधिकारी क्लोडे, सवर्ग विकास अधिकारी मुंडकर, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना विनोद नागपुरे, उपसभापति अशोक रेचनकर फिरोज पठाण, देविदास सातपुते, संतोष बंडावार, अशोक रेचनकार,बालाजी चनकापुरे उपस्तीत होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top