Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १७ सप्टेंबरला राजुरा मुक्ती दिन समारोह
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१७ सप्टेंबरला राजुरा मुक्ती दिन समारोह प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव व प्रकाश पोहरे मार्गदर्शन करणार राजुरा, मराठवाडा मुक्तीसंग्राम अम...
१७ सप्टेंबरला राजुरा मुक्ती दिन समारोह
प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजित भालेराव व प्रकाश पोहरे मार्गदर्शन करणार
राजुरा, मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष
----------------------------- राजुरा भूषण २०२२ चे मानकरी -----------------------------
ललिता टाकभौरे - करमनकर * देवराव पवार * राहुल चव्हाण * अविनाश पोईनकर * रिया लेखराजानी * अनिवृद्ध डाखरे
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा मुक्ती दिन अमृत महोत्सव समिती द्वारे दिनांक १७ सप्टेंबरला सायंकाळी ५-३० वाजता राजुरा येथील मा.सा.कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात मुक्ती दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे भूषविणार असून उद्घाटन मराठवाडा येथील प्रसिद्ध साहित्यिक, ग्रामीण कथाकार व कवी इंद्रजित भालेराव यांचे हस्ते होणार आहे. आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सर्वश्री ॲड.विठ्ठलराव धोटे, ॲड. वामनराव चटप, ॲड.संजय धोटे, सुदर्शन निमकर आणि सर्व माजी नगराध्यक्ष व अनेक गणमान्य नेते उपस्थित राहणार आहेत.
सन २०२२ करिता राजुरा भुषण सत्कारमूर्ती यांची निवड घोषीत करण्यात आली आहे. यावर्षी या भागातील पहिली महिला न्यायाधीश ललिता टाकभौरे - करमनकर, बंजारा समाजातील पहिले वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, जिवती तालुक्यातील पहिले पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक अविनाश पोईनकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एमबीए टॉपर व सहा सुवर्णपदक विजेती रिया लेखराजानी आणि नीट परीक्षेत देशातून ३८ वा व राज्यांतून ५ वा आलेला अनिरुद्ध डाखरे यांची राजुरा भुषण सन्मानासाठी निवड घोषीत करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण नुकतेच साजरे केले. आता दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर २०२३ हे राजुरा, मराठवाडा यांचे मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आहे. पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे संयोजक अनिल बाळसराफ यांनी सांगितले की, हैद्राबाद - मराठवाडा - राजुरा मुक्तीसंग्राम हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नव्हता तर जुलमी व अन्यायी राजेशाहीच्या विरोधात लोकशाहीचा लढा होता. या दृष्टीनेच या मुक्तीसंग्राम लोकलढ्याकडे पाहिले पाहिजे. या मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त राजुरा - कोरपना - जिवती मुक्ती दिन अमृत महोत्सव समितीने वर्षभर या संपूर्ण भागात विविध प्रकारे साजरा करण्याचे ठरविले आहे. यादृष्टीने विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर ला राजुरा येथील मा. सा. कन्नमवार सभागृहात होणारा हा अमृत महोत्सवाचा शुभारंभ कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम थाटात साजरा होणार अनेकांना प्रेरणादायी ठरणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन राजुरा मुक्ती दिन उत्सव समितीचे संयोजक अनिल बाळसराफ, मराठवाडा केंद्रीय समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, प्राचार्य दौलत भोंगळे, दिलीप सदावर्ते, प्रा.हेमचंद दूधगवळी, उपप्राचार्य विजय आकनुरवार, प्रा. विशाल मालेकर, सुदाम राठोड, मिलिंद गड्डमवार, नीळकंठ कोरांगे, सतलुबाई जुमनाके, अल्का सदावर्ते, स्वरुपा झंवर, मिलिंद देशकर, गणेश बेले यांनी पत्रकार परिषदेत केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top