Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी फुलझरी येथील घटना डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - मूल तालुक्यातील फुलझरी येथील गुराखीला वाघान...
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
फुलझरी येथील घटना
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
मूल तालुक्यातील फुलझरी येथील गुराखीला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजता घडली. किसन आबाजी वसाके वय 50 असे गंभीर जखमीचे नाव आहे 
किसन हा गुराखी असून गावातील जनावरे चरण्याकरिता जंगलात गेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने किसनवर हल्ला करून गंभीर जखमी केले. घटना गावात माहिती होतास नागरिकांनी वनविभागाला माहिती देऊन लगेच मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले. सध्या जखमीचे मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top