Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: समाजात शिक्षकाचे स्थान सर्वोच्च - अँड वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाजात शिक्षकाचे स्थान सर्वोच्च - अँड वामनराव चटप शिक्षिका करुणा गावंडे-जांबुळकर, शिक्षिका सुशीला पोरेड्डीवार यांचा मान्यवरांकडून सत्कार गों...
समाजात शिक्षकाचे स्थान सर्वोच्च - अँड वामनराव चटप
शिक्षिका करुणा गावंडे-जांबुळकर, शिक्षिका सुशीला पोरेड्डीवार यांचा मान्यवरांकडून सत्कार
गोंडवाना विद्यापीठात सिनेट सदस्य निवडून आलेले प्राध्यापक प्राचार्य संभाजी वारकड, प्रा. संजय गोरे, प्रा. दीपक धोपटे यांचा सत्कार
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -   
शिक्षक हा समाजाला दिशा देणारा असतो, त्यामुळे शिक्षकाचे स्थान समाजात सर्वोच्च मानले जाते, नेत्याने चूक केली तरी तो समाजाचे फारसे नुकसान करू शकत नाही अश्या नेत्यांना पाच वर्षात घरात बसविण्याची ताकद लोकशाहीत आहेत, मात्र शिक्षकाने चूक केली तर एक पिढी बरबाद होते, त्यामुळे शिक्षकांनी पावित्र्याने वागले पाहिजे असे प्रतिपादन विदर्भ आंदोलनाचे नेते माजी आमदार एड वामनराव चटप यांनी केले.
राजुरा पत्रकार संघ, पत्रकार मित्र व जेसीआय ट्रायल राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा पत्रकार संघाच्या कार्यालयात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच गोंडवाना विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून निवडून आलेले प्राध्यापक, याशिवाय सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या काही मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. 
यावेळी माजी आमदार अँड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, माजी शहराध्यक्ष अरुण धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य दौलतराव भोंगळे, प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, प्रा. संजय गोरे, प्रा. दीपक धोपटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार उपस्थित होते. 
शिक्षकांनी ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राच्या स्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली, तसेच सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जुगाड लावून पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकांच्या वृत्तीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. पुरस्कार हा गुणवत्तेच्या जोरावर मिळाला पाहिजे असे मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, प्रा. संजय गोरे, प्रा. दीपक धोपटे, शिक्षिका करुणा गावंडे-जांभुळकर, शिक्षिका सुशीला पोरेड्डीवार, अँड. दीपक चटप यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षकांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली आणि विद्यापीठातील सिनेट सदस्यांच्या निवडीमध्ये अतुलनीय सुधारणा करण्याबाबत बोलताना राज्यपालांनी 60=40 च्या फॉर्म्युल्याचा फटका शिक्षणाला बसत असल्याची माहिती दिली. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वरूप झंवर, स्वरप्रीती अकादमीच्या संयोजिका अलका सदावर्ते, जेसिसच्या सुशीला शुक्ला, पत्रकार तसेच नागरिक उपस्थित होते. संचालन जेष्ठ पत्रकार अनिल बाळसराफ यांनी तर प्रास्ताविक प्रा. बी.यु. बोर्डेवार यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top