Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: २२ सप्टेंबरला बेलदार समाजाचा पोलिस अधिक्षक कार्यालयावर विशाल मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाज बांधवानी बहु संख्येने उपस्थित राहावे - आनंदराव अंगलवार वर्धा येथील मोहिते अत्याचार प्रकरण विशेष प्रतिनिधी - चंद्रपूर - बेलदार समाजाच्या...
समाज बांधवानी बहु संख्येने उपस्थित राहावे - आनंदराव अंगलवार
वर्धा येथील मोहिते अत्याचार प्रकरण
विशेष प्रतिनिधी -
चंद्रपूर -
बेलदार समाजाच्या व विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचे विविध संघटांनी एकत्र येऊन संगीता हिम्मत मोहिते रा. तळेगाव (टालेटूला) जिल्हा वर्धा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाना कडक शिक्षा करून संगिता मोहिते ला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा, पोलिस अधिक्षक वर्धा यांना निवेदन देण्यासाठी दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोज गुरुवारला दुपारी १२.०० वाजता तानेलवार हॉल अँड लान बोरगाव मेघे फ्फर्मसी कॉलेज समोर हिंगणघाट रोड वर्धा शहर येथे सभा गृहात निषेध सभा आटोपून शहरातील मुख्यामार्गाने बेलदार व तत्सम समाजाचे विशाल निषेध मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व पोलिस अधिक्षक वर्धा यांना निवेदन दिले जाणार आहे. या निषेध मोर्चात महाराष्ट्र व विदर्भातील विविध संघटनांचे नेते व पदाधिकारी सह समाज बांधव प्रमुख शहरातून हजारोंच्या संख्येने जनाक्रोष उपस्थीत राहणार आहे.
सदर मोर्चाचे नेतृत्व रमेशभाऊ जाधव प्रदेश अध्यक्ष बेलदार भटका समाज महाराष्ट्र राज्य, राजुभाऊ साळुंखे, भगवान चव्हाण, सुदाम पवार, प्रभू राज चव्हाण, संजय चव्हाण, सुकदेव मोहिते, रोहिदास चव्हाण, संतोष मोहिते, संतोष चव्हाण, राजू चव्हाण, हिम्मत मोहिते, कृष्णा जाधव, रवी चव्हाण व चंद्रशेखर कोटेवार, प्रांतीय अध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना मुख्यालय चंद्रपूर, आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली विनोद जाधव ओड बेलदार समाज पुणे, मुकुंदा अडेवार संघर्ष वाहीनी नागपुर, अरविंद गंगुलवार यवतमाळ संजय कोट्टेवार व पुणे, मुंबई, सह मराठवाडा, खानदेश, विदर्भातील प्रमुख व विविध संघटनांचे प्रमुख सभेत मार्गदर्शन करून मोर्चा निघणार आहे करिता समाज बांधवानी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आयोजन समितीतील फुलचंद चव्हाण अनील चव्हाण, सुधिर ताटेवार वर्धा जिल्हा प्रमुख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top