Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कर्तुत्ववान माणसे हे समाजाचे भुषण - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शासकीय अर्धशाशकिय सेवकांची सहकारी पतसंस्था ची ५६ वी वार्षिक आमसभा संपन्न तालुका प्रतिनिधी राजुरा - शासकीय अर्धशाशकिय सेवकांची सहकारी पतसंस्थ...
शासकीय अर्धशाशकिय सेवकांची सहकारी पतसंस्था ची ५६ वी वार्षिक आमसभा संपन्न
तालुका प्रतिनिधी
राजुरा -
शासकीय अर्धशाशकिय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरा ची ५६ वी वार्षिक आमसभा साने गुरुजी सभागृह, देशपांडे वाडी, राजुरा येथे घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण तथा सेवानिवृत्ती सभासदांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, कर्तुत्ववान माणसे ही कोणत्याही समाजाचे भुषण असतात. आपल्या पतसंस्थेने या कार्यक्रमातून जुन्या व नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले. या सत्कारातून नवयुवक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळून ते पून्हा नव्या जोमाने काम करतील अशी आशा आहे. तसेच सेवा सहकारी संस्थेने आपल्या आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक दायित्वाचे भान असेच सदैव जपावे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी संस्थेचे सर्व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी तथा इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर नप अध्यक्षा सविता टेकाम, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अन्नाराव आडे, उपाध्यक्ष कैलाश म्हैसके, सचिव अंकुश कुळमेथे, संचालक प्रभाकर जूनघरे, राजेश देवगडे, संजय लांडे, उमाजी कोडापे, येशोधा राठोड, द्रोपदी दरेकर, अंबादास जाधव यासह सर्व सत्कारमुर्ती, गुणवंत विद्यार्थी, संस्थेचे सर्व संचालक, सभासद, शिक्षकवृंद उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top