Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचेही योगदान - आमदार प्रतिभा धानोरकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचेही योगदान - आमदार प्रतिभा धानोरकर वरोरा काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सादिक थैम - आमचा विदर...
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचेही योगदान - आमदार प्रतिभा धानोरकर
वरोरा काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
वरोरा -
शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात परंतु विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचेही मोठे योगदान असते असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना विद्यार्थी यशवंत, किर्तीवंत होताना आपल्या परिवाराचे, आपल्या शाळेचेच नाही, तर आपल्या गावाचाही लोकिक वाढवितात असे आमदार धानोरकर म्हणाल्या.
वरोरा शहर काँग्रेस कमिटीतर्फे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज पार पडला. वरोरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विलास टिपले, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष रत्ना अहिरकर, शहराध्यक्ष दिपाली माटे, माजी जिप सदस्य सुनंदा जीवतोडे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
वरोरा तालुक्यातील माध्यमिक शालांत परीक्षेतील पलक जोबनपुत्रा, सानिया सिंग, नीरज हरियाणी, गायत्री मत्ते, नंदिनी  बरडे, आर्यन लोडे, गायत्री निखाडे, पलक मांडवकर व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत  मृणाल लाभे, कीर्तिराज जमनोटिया, लब्धी गांधी, हिमांशी बोरा, ज्ञानेश्वरी हिवरे या गुणवंतांचा त्यांच्या पालकासह शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात जयपूर येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठस्तरीय वुडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाकडून खेळणाऱ्या आनंद निकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मयुरी गाडगे, विशाखा भोयर, अनुजा खिरटकर, अंजली चौधरी, मयुर भोयर या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडुंचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात काँग्रेस पदाधीकारी मनोहर स्वामी, छोटूभाई शेख, प्रदीप बुराण,बसंत सिंग, राजु मिश्रा, सुभाष दांदले , अनील झोटींग, सनी गुप्ता, सलीम पटेल, प्रफुल्ल आसुटकर,राहील पटेल, प्रमोद काळे,चेतना शेट्टे, शिरोमणी स्वामी, ऐश्वर्या खामनकर,मंगला पिंपळकर, संगीता आगलावे, मीना रहाटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top