Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ८ ते १० ऑगस्‍ट दरम्‍यान तीन दिवसीय व्‍याख्‍यानमालेचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ८ ते १० ऑगस्‍ट दरम्‍यान तीन दिवसीय व्‍याख्‍यानमालेचे आयोजन आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे व्‍याख्‍याते डॉ. सच्चिदानंद ...
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ८ ते १० ऑगस्‍ट दरम्‍यान तीन दिवसीय व्‍याख्‍यानमालेचे आयोजन
आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे व्‍याख्‍याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्‍याख्‍यान
डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर संस्‍थेचा उपक्रम
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
चंद्रपूर -
भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमीत्‍त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर या संस्‍थेच्‍या वतीने दिनांक ८, ९ आणि १० ऑगस्‍ट २०२२ दरम्‍यान तीन दिवसीय व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करण्‍यात आले आहे. प्रियदर्शिनी नाटयगृह, चंद्रपूर येथे सायं. ७.०० ते ९.०० वा. दरम्‍यान आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे व्‍याख्‍याते, विचारवंत आणि साहित्‍यीक डॉ. सच्चिदानंद शेवडे हे या व्‍याख्‍यानमालेचे पुष्‍प गुंफणार आहेत.
या तीन दिवसीय व्‍याख्‍यानमालेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार राहणार आहे. दिनांक ८ ऑगस्‍ट रोजी सावरकर एक झंझावात या विषयाचे पहिले पुष्‍प, दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी सावकर एक झंझावात या विषयाचे दुसरे पुष्‍प तसेच १० ऑगस्‍ट रोजी वंद्य वंदे मातरम् हे पुष्‍प डॉ. सच्चिदानंद शेवडे गुंफतील. तीनही दिवस हर घर तिरंगा या अभियानावर ते विस्‍तृत भाष्‍य करणार आहे.
स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमीत्‍त आयोजित या देशभक्‍तीपर व्‍याख्‍यानमालेचा लाभ चंद्रपूरकर नागरिकांनी मोठया संख्येने घ्‍यावा, असे आवाहन डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरच्‍या अध्‍यक्षा सौ. अमिता बोनगीरवार, उपाध्‍यक्ष हरीश शर्मा, सचिव अनिल बोरगमवार, सहसचिव राजेश्‍वर सुरावार, कोषाध्‍यक्ष राजीव गोलीवार, सदस्‍य प्रकाश धारणे, सौ. रेणुका दुधे यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top