Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आमदार सुभाष धोटे यांनी केला गॅस्ट्रो ग्रस्त गावांचा दौरा : केली रुग्णांची विचारपूस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटे यांनी केला गॅस्ट्रो ग्रस्त गावांचा दौरा : केली रुग्णांची विचारपूस प्रभावी उपाययोजना अमलात आणण्याचे डॉक्टरांना दिले निर्देश ...
आमदार सुभाष धोटे यांनी केला गॅस्ट्रो ग्रस्त गावांचा दौरा : केली रुग्णांची विचारपूस
प्रभावी उपाययोजना अमलात आणण्याचे डॉक्टरांना दिले निर्देश
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा तालुक्यातील प्राथमिक उपकेंद्र टेंबुरवाही, प्राथमिक उपकेंद्र सोंडो, प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा, व ग्राम पंचायत येरगव्हण या गावांना भेटी देऊन येथील गॅस्ट्रोच्या साथीने प्रभावित रुग्णांच्या तबेती विषयी विचारपूस करून स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखल रुग्णांवर योग्य उपचार करणे तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी निर्देश दिले. गावातील ग्रामसेवकांना सक्त सूचना दिल्या की, बोगस ब्लिचिंग पावडर वापरू नये, गावातील नळ योजनेतील टाकीमध्ये चांगल्या क्वालिटीचे ब्लिचिंग पावडर टाकून पाणी स्वच्छ करण्यात यावे, गावातील परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ग्रामपंचायत देवळा येथील पाणी टाकी स्वच्छ करण्यासाठी दोन दिवस नळ योजना बंद ठेवून पूर्ण टाकी स्वच्छ करावी तसेच उत्तम दर्जेच्या ब्लिचिंग पावडर वापरावे असे सांगीतले तर या दोन दिवसात राजुरा नगर परिषदेच्या  टॅंकरने शुध्द पिण्याचे पाणी येथे पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. गावातील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशक द्रावण टाकून एखादी तासांनी पाणी प्यावे अशा प्रकारे काळजी घेण्यास स्थानिक नागरिकांना आवाहन केले. 
या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, सहाय्यक गटविकास अधिकारी ताजने, विस्तार अधिकारी रत्नपारखी, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश खोब्रागडे, आरोग्य विस्तार अधिकारी पोवार, उपकेंद्रे टेंबुरवाही चे वैद्यकिय अधिकारी सोनाली करमरकर, ग्रामसेवक बदखल, माजी सभापती मुमताज जावेद अब्दुल,माजी उपसरपंच चेतन जयपूरकर, उपसरपंच अब्दुल जावेद, देवाडा सोसायटी अध्यक्ष शंकर बोंकुर, माजी पस सदस्य अब्दुल जमीर, राधेश्याम कुर्मावार, भगवान हरंदरे, प्रभाकर चेनुरवार, शिव बाँकुर, शंकर मडावी, डॉ विपीन ओदेला, डॉ गजेंद्र अहिरकर, मनोहर रणदिवे अशोक अमृतकर, ॲड. मारोती कुरवटकर, किसनराव राऊत, गणेश बोबडे, कुडीराम नेवहारे किरण तोरे, मनोहर अमृतकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष फकरू कुळसंगे, नरेशराव होरे, रमजानखा पठाण, रविकिरण बावणे, पोलीस पाटील गुलाब करमनकर, श्रीकांत होरे, अफसर भाई, संतोष कुरवटकर, यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top