Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दुसऱ्यांदा अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुसऱ्यांदा अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा  पुन्हा परराज्यातील जुगारी जाळ्यात सापडले आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क  विरुर स्टेशन - राजुरा ता...
दुसऱ्यांदा अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 
पुन्हा परराज्यातील जुगारी जाळ्यात सापडले
आमचा विदर्भ न्यूज नेटवर्क 
विरुर स्टेशन -
राजुरा तालुक्यातील वरूर रोड हे शेजारील तेलंगणा राज्यातील जुगाऱ्यांसाठी नंदनवन ठरत असल्याचे दिसत असून मागील काही दिवसांत दुसऱ्यांदा ह्या गावात अवैध जुगार खेळताना पोलिसांनी धाड घालुन आरोपींना अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. परराज्यातील जुगारी थेट महाराष्ट्रात येऊन जुगार चालवत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ह्या गावात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत असून या गावातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी दुसऱ्यांदा धड टाकली. 
यापूर्वीही वरुर रोड येथील चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंतरराज्यीय जुगार अड्डा उध्वस्त करण्यासाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक याना यावे लागले होते. ह्या घटनेला काही महिने उलटत नाही तोच आज पोलिसांनी धाड घालून अवैध जुगार खेळणाऱ्या परराज्यिय नागरिकांना मुद्देमालासह अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार राहुल चव्हाण गस्तीवर असताना मौजा वरूर रोड येथे एका टिनाच्या शेड मध्ये अवैध रित्या जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ह्या ठिकाणी अवैध जुगार सुरू असुन नियमबाह्यपणे कटपत्यावर पैशांची बाजी लावण्यासाठी परराज्यातील जुगारी आले असल्याची माहिती मिळताच ठाणेदारांनी आपल्या चमुसह जुगार अड्ड्यावर धाड घालून ७९०० रुपये रोख रकमेसह मुद्देमाल ताब्यात घेतला व व्यंकटा नरसय्या रज्जम गडम वय ४५ रा इंधनपली (तेलंगाणा), जगदीश गोड गडमावर वय ५५ रा रामपुर (तेलंगाणा), सत्यनारायण लाच्मया गुऱ्हम, वय ५८ रा असिफाबाद (तेलंगाणा), कलकी क्रीष्णा चंद्रशेखर वय ४५ रा पेदापली (तेलंगाणा), रमेश रेबंना खणक्या वय ३३ रा रेबेना (तेलंगाणा), व्यंकटेश मलया तोटा वय ३६ रा मंचेरियाल (तेलंगाणा) ह्यांना अटक करून त्यांचेवर जुगार कायद्या अंतर्गत वर गुन्हा दाखल करून सुचनापत्रावर सोडण्यात आले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top