Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरची कार्यवाही सूडबुद्धीची - बबन उरकुडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरची कार्यवाही सूडबुद्धीची - बबन उरकुडे राजुऱ्यात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा विरेंद्र पुणेकर - आमचा विद...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरची कार्यवाही सूडबुद्धीची - बबन उरकुडे
राजुऱ्यात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यभर शिवसेनेच्या वतीने जोरदार आक्रोश आंदोलन सुरु आहे. राजुरा शिवसेनेच्या वतीने आज पंचायत समिती चौकात केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.
देशाच्या इतिहासात भाजपच्या कार्यकाळात आवाज उठवणाऱ्या विरोधकांवर ईडी सुडबुद्धीने कार्यवाही करत असून अश्याप्रकारची मक्तेदारी थांबली पाहिजे असं मत शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी यावेळी व्यक्त केल. 
शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निषेध आंदोलन सुरु आहे. या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव चापले, राजुरा शहर प्रमुख राकेश चिलकुलवार, जीवन बुटले, युवासेना तालुका प्रमुख अमित मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे,  तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, सास्ती विभाग प्रमुख बबलु कुशवाह,  सास्ती गोवरी जिप सर्कल प्रमूख संदीप वैरगडे, उपतालुका प्रमूख सुधाकर पा. मोरे, कुणाल कुडे, प्रवीण पेटकर, गणेश चोथले, स्वप्नील मोहूर्ले, लखा, प्रफुल मदास्ववार, वतन मादर, समीर शेख, आकाश बकाने, शुभम अत्राम व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top