Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विज पडून गुराख्याचा जागीच मृत्यू तर एक जखमी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विज पडून गुराख्याचा जागीच मृत्यू तर एक जखमी आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क भद्रावती - नगर पालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणी...
विज पडून गुराख्याचा जागीच मृत्यू तर एक जखमी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
भद्रावती -
नगर पालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणी लगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात जनावरे राखत असताना बुधवारी दुपारी 2.5 वाजताच्या दरम्यान वीज पडून गुराख्याचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. 
संजय काशिनाथ चालखुरे (५५) वर्ष रा. बरांज (मोकासा) असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव आहे. तर विकास डाखरे (२२) वर्ष रा.बरांज (मोकासा) असे जखमीचे नाव आहे. भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल करून प्रेत ताब्यात घेतले व शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top