Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: काँग्रेसच्या आवारपुर, नांदा, बिबी ते गडचांदुर आझादी गौरव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काँग्रेसच्या आवारपुर, नांदा, बिबी ते गडचांदुर आझादी गौरव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद  आमदार सुभाष धोटेंनी केली पदयात्रेतून जनजागृती धनराज...
काँग्रेसच्या आवारपुर, नांदा, बिबी ते गडचांदुर आझादी गौरव पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
आमदार सुभाष धोटेंनी केली पदयात्रेतून जनजागृती
धनराजसिंह शेखावत -  प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुका कांग्रेस, नांदाफाटा शहर कांग्रेस, बिबी आणि गडचांदुर शहर काँग्रेसच्या वतीने लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त आवारपुर, नांदा फाटा, बिबी ते गड़चांदुर पर्यंत आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत नांदा फाटा, बिबी येथे सभा घेण्यात आली. या सभेत काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील संघर्ष, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांचे बलिदान, या ७५ वर्षात देशाच्या विकासात काँग्रेसचे योगदान इत्यादी अनेक विषयांवर जनजागृती केली. सोबतच आमदार सुभाष घोटे नी महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण आणि शेतकऱ्यांची दुर्दशा सारख्या अनेक विषयवार बोलताना केंद्र सरकारच्या नीतीचा विरोध केला. या पदयात्रेत सभोवताल अनेक गावांतील स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले आणि उत्तम प्रतिसाद देत सहभाग घेतला.
या प्रसंगी नांदा फाटा व बिबी येथील कार्यमात काँग्रेस न. प. अध्यक्षा सौ. सविता टेकाम, नप गटनेते विक्रम येरने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, ज्येष्ठ नेते पापय्या पोन्नमवार, सचिन भोयर, श्यामसुंदर जी राउत, मुरलीधर बल्की, आनंदराव पावड़े, उमेश राजुरकर, आशी देरकर, अभय मुनोत, महेश राउत, हारून सिद्दीकी यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top