Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वरोरा पंचायत समिती येथील भ्रष्टाचारा विरोधात अखिल वरोरा शिक्षक संघ पोलिसात तक्रार दाखल करणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरोरा पंचायत समिती येथील भ्रष्टाचारा विरोधात अखिल वरोरा शिक्षक संघ पोलिसात तक्रार दाखल करणार   सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी वरोर...
वरोरा पंचायत समिती येथील भ्रष्टाचारा विरोधात अखिल वरोरा शिक्षक संघ पोलिसात तक्रार दाखल करणार 
सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
वरोरा -
वरोरा पंचायत समिती कार्यालयाने लेखा वर्ष २०२२-२३ चा आयकर त्यांच्या नावावर जमा न करता परस्पर गहाळ केल्याचे कर्मचाऱ्यांनी काढलेल्या २६-ए.एस. वरुन दिसत आहे.
मागच्या वर्षीही कार्यालया कडून असाच प्रकार घडला होता. याबाबत विचारणा केली असता उत्तर मिळाले नव्हते व ,मागच्या वर्षीचा पगारातून दरमहा  कपात केलेला आयकर संबंधितांच्या नंबरवर जमा केलेला नाही. संबंधितांना रिटर्न फाईल करतेवेळी पगारातून नियमित कपात केली असतांनाही आगावू रक्कम नाईलाजास्तव भरावी लागत होती. 
या वर्षीही कार्यालयाने नियमित दरमहा आयकर कपात करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयकर त्यांच्या नावावर अजूनही जमा केलेला नाही. त्यामुळे नक्कीच पंस वरोरा ने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेला सन २०२२-२३ या लेखा वर्षातील आयकर गहाळ किंवा अपहार तर केलेला नाही ना अशी शंका शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
ही अतिशय गंभीर बाब असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे अखिल वरोरा शिक्षक संघाने संवर्ग विकास अधिकारी वरोरा यांच्या विरोधात संघटनेच्या वतिने पोलिसात तक्रार नोंदविण्याची परवानगी मागण्यासाठी निवेदन दिले आहे. 
वरोरा पंचायत समितीत कर्मचाऱ्यांची संख्या व त्यांच्या पगारातून दरमहा आयकरासाठी कपात केली जाणारी रक्कम ही प्रत्येकी वर्ष अखेरपर्यंत वीस ते तीस हजार रुपयांपर्यंत असते. संबधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेली ही रक्कम आयकर विभागाला का पोहचली नाही? अथवा कुठे गहाळ तर  झाली ना? हा आता तपासाचा विषय बनला असून संदर्भात वेळप्रसंगी अखिल वरोरा शिक्षक संघ आंदोलनाचा पवित्रा उचलण्याच्या तयारीत आहे. अशी माहिती संघाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top