Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: देशी कट्टा व घातक शस्त्रासह आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देशी कट्टा व घातक शस्त्रासह आरोपीला अटक आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राजुरा - राजुरा शहरात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधा...
देशी कट्टा व घातक शस्त्रासह आरोपीला अटक
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा शहरात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सोमनाथपुर वार्डात शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती अज्ञात व्यक्तींनी पोलिसांना दिली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच लांबजोत सिंग यांच्या घराची झडती घेण्यात घेतली यात पोलिसांना एक देशी बनावटीचा कट्टा, एक देशी पिस्टल, एक स्टील तलवार व चक्र असलेला रॉड आढळून आला सदर हत्यार पोलिसांनी जप्त करून लांबजोतसिंग हरदेव सिंग देवल या आरोपी विरोधात 3,4,25 आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही विधिसंघर्ष बालक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. एस.व्ही. दरेकर, पोलीस उपनिरीक्षक हिराचंद गव्हारे, नागोराव भेंडेकर, संदीप बुरडकर, रामा भिंगेवाड यांनी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top