Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कर्जबाजारीमुळे युवकाची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कर्जबाजारीमुळे युवकाची आत्महत्या आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क  मूल - कर्जबाजारी व सततच्या नापिकीमुळे सदाशिव प्रकाश भंडारे वय २९ वर्षे रा. नां...
कर्जबाजारीमुळे युवकाची आत्महत्या
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
मूल -
कर्जबाजारी व सततच्या नापिकीमुळे सदाशिव प्रकाश भंडारे वय २९ वर्षे रा. नांदगांव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे.
मूल तालुक्यातील मौजा नांदगांव येथील मनोहर रघुजी भंडारे वय ७० वर्षे यांची नांदगांव येथे शेती असून ती शेती त्यांचे नातु सदाशिव प्रकाश भंडारे हे करीत होते, शेती करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि बचत गटाकडुन कर्ज घेतले होते व शेतात धान आणि कपाशीची लागवड केली मात्र संततधार पावसामुळे तिनदा लागवड करूनही काहीही फायदा होत नसल्याने मागील ८ दिवसापासुन तो नैराश्यातून सदाशिव प्रकाश भंडारे वय २९ वर्षे रा. नांदगांव या युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाचे शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान जगदीश मोहुर्ले यांच्या शेतातील शेत तलावात उडी घेवुन आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात मोठा आत्पपरिवार आहे. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top