Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वरोरा-चिमूर मार्गाचे काम करणाऱ्या कंपनी व्यवस्थापकास डांबले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वरोरा-चिमूर मार्गाचे काम करणाऱ्या कंपनी व्यवस्थापकास डांबले सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी वरोरा - वरोरा-चिमूर वरोरा मार्गाचे काम ...
वरोरा-चिमूर मार्गाचे काम करणाऱ्या कंपनी व्यवस्थापकास डांबले
सादिक थैम - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
वरोरा -
वरोरा-चिमूर वरोरा मार्गाचे काम धीम्या गतीने सुरू आहे वरोरा तालुक्यातील खैरगाव जवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुसळधार पावसात या बांधकामा जवळ पाणी गोळा झाले पाणी निघण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्याने पाणी जवळच्या शेतात गेले किती असलेल्या कुकुट पालन शेडमध्ये पाणी गेले. त्यातील सर्व कोंबड्या मरण पावल्या. शेतकऱ्याचे चार लाखापेक्षा अधिक नुकसान झाले ही नुकसान भरपाई कंपनीने द्यावी अशी वारंवार मागणी केली परंतु कंपनीने दिली नाही. त्यामुळे आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापकास त्याच्या कक्षाला बाहेरून कुलूप लावून ठेवण्याची घटना घडली. 
अतुल नन्नावरे या युवकाचे शेत चिमूर वरोरा मार्गालगत मौजा खैरगाव येथे आहे. मागील काही वर्षापासून शेतीला जोडधंदा म्हणून कुकुट पालन व्यवसाय सुरू केला. अतुल नन्नावरे यांच्या शेता नजीक एस.आर.के. कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मागील दहा दिवसात मुसळधार पाऊस आला कंपनी ने पाणी जाण्याचे कुठले नियोजन केले नाही. त्यामुळे पाच ते सहा फूट उंचीपर्यंत पाणी गोळा होऊन अतुल नन्नावरे यांच्या कुक्कुटपालन शेडमध्ये गेले. पाणी अधिक असल्याने शेडमध्ये जाता आले नाही, त्या पाण्याने पूर्ण कोंबड्या मरण पावल्या, पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. त्या पंचनाम्यात पुलाचे बांधकाम करणारी कंपनी दोशी असल्याचे नमूद केले आहे. याबाबत वरोरा तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले. कंपनीकडे नुकसान भरपाईची वारंवार मागणी करून कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत होते, अखेरीस 21 जुलै रोजी वरोरा चिमूर मार्गालगत भेंडाळा गावात असलेल्या कंपनी कार्यालयात शेतकरी धडकले व व्यवस्थापन आत मध्ये बसून असताना त्याच्या कक्षाला बाहेरून कुलूप लावले. यावेळी जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र चिकटे, योगेश खामनकर, अनिल पावडे, अतुल नन्नावरे, प्रवीण बदकी, रवी देसाई, राहुल नन्नवरे, नवोदय धोबे, तुषार कडू, विकी वानखेडे, अक्षय पांडे, विशाल मुंगले, शुभम मोरे आदी उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top