Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न व्हाईट गोल्ड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि शेतीतज्ञ गजानन जाधव यांनी केले मार्गदर्श...
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
व्हाईट गोल्ड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि शेतीतज्ञ गजानन जाधव यांनी केले मार्गदर्शन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
मागील दोन आठवड्यापासून महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पाऊसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला आतापर्यंत दोनदा प्रचंड पूर आला असून वर्धा नदीच्या पूरामुळे साधारण ४० गावे प्रभावित झाले आहेत. या पूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातील मुख्यत्वे कापूस आणि सोयाबिन पिकाची प्रचंड हानी झाली आहे. वर्धा नदीच्या परिसरात प्रमुख पिकं म्हणून कापूस आणि सोयाबीन घेतले जाते. यावर्षी वाढलेल्या बी-बियाणे, खतांच्या किमंती बघता दरवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के जास्तं पैसा खर्च करून उभारलेली शेती तर पाण्यात गेलीच परंतु इथून वर्धा नदी परिसरातील ४० गावाची वाटचाल ही नापिकीकडे आहे. 
या विपरीत परिस्थितीत शेतकऱ्याने सावरण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? इथून पुढे सोयाबीन किंवा कापूस पुन्हा लावावे का? ज्यांच सोयाबीन आणि कापूस बचावला आहे त्यांनी पुढील पिकांचे व्यवस्थापन कसे करावे? यासारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा होणे अत्यंत गरजेचे होते. या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ‘कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने’ राजुरा येथे कापूस-सोयाबीन पिक परिसंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला व्हाईट गोल्ड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि शेतीतज्ञ गजानन जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत ३० गावातील २५० शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. शेतकऱ्यांनी आपापल्या सर्व समस्या गजानन जाधव यांच्या समक्ष मांडल्या व त्यावर सविस्तर मार्गदर्शक जाधव यांनी केलं. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी चेतन चव्हाण उपस्थित होते. कृषक स्वराजच्या वतीने संस्थेचे संस्थापक व संचालक सतीश गिरसावळे कृषक स्वराजच्या पुढील योजना याविषयी चर्चा केली.
या संवाद कार्यक्रमाचे संचालन अंकित वडस्कर यांनी केले तर कार्यक्रमच्या यशस्वितेकरिता कृषक स्वराजचे अमेय धोटे, देवानंद गिरसावळे, प्रमोद वडस्कर, भास्कर धोटे, अमोल भोंगळे, भाविक पिंपळशेंडे, सौ. वैशाली काटवले यांनी प्रयत्न केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top