Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने आनंदोत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने आनंदोत्सव साजरा राजुरा भाजप कार्यालयाच्या समोर माजी आमदार अँड. संजय धोटे यांचे नेत...
राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने आनंदोत्सव साजरा
राजुरा भाजप कार्यालयाच्या समोर माजी आमदार अँड. संजय धोटे यांचे नेतृत्वात ढोल-ताशे व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वात व मान्यवरांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी भगिनीला संधी देऊन महिलांचा सन्मानच केला. त्याचबरोबर महामहिम द्रौपदी मुर्मू यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करुन देशातील सर्वोच्चपदावर विराजमान केले. त्याबद्दल पंतप्रधान मा.मोदीजी तसेच सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो अशे याप्रसंगी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे यांनी म्हटले.
याप्रसंगी माजी सभापती सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा नेते अरुण मस्की, भाजपा जिल्हा सचिव वाघुजी गेडाम, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्वाती देशपांडे, माजी नगरसेवक राधेश्याम अडानिया, जेंद्र डोहे, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे ,महामंत्री प्रशांत घरोटे, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगनलावार, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन डोहे, भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा नेते महादेव तपासे, प्रदीप देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, विनोद नरेदृवार, राहुल सूर्यवंशी, सचिन बैस, रमेश मेश्राम, प्रदीप बोबडे, नितीन बामरटकर, सुरेश कलपलीवार, श्रीनिवास कोपुला, कैलास कार्लेकर, पराग दातारकर, अरुण लोहबळे, संदीप मडावी, तुलाराम गेडाम, शंकर गेडाम, जलया पोचम आदी भाजपा पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top