Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क माजरी वरोरा-वणी मार्गावरील कुचना-पाटाळा मध्ये असलेल्या कोराडी नाल्याच्या पुला...
नाल्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
माजरी
वरोरा-वणी मार्गावरील कुचना-पाटाळा मध्ये असलेल्या कोराडी नाल्याच्या पुलाखाली एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती माजरी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा केला व पोलीस स्टेशन माजरी येथे मर्ग दाखल केला.
पोलीस डायरी नुसार मृतकाचे अंदाजे वय ५० ते ५५ असून अंगात फिक्कट गुलाबी चौकट शर्ट, निळा पॅन्ट, फुल बाह्यांची बनियन, सळपातळ बांदा, हलकी मिशी, दाडी व केस पिकलेले, अर्धे टक्कल पडलेला आहे तसेच त्याच्या डोक्याला मार आहे या वर्णनाच्या इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास पोलीस स्टेशन माजरी येथे संपर्क करावा असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. 
सदर घटनेची माहिती वरोरा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असता वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अज्ञात इसमाची हत्या करून नाल्यात फेकले असावे असा संशय व्यक्त करण्यात केला आहे. सदर व्यक्तीची हत्या की आत्महत्या हे सध्या गुलदस्त्यात असून पोलीस मृतकाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. सदर व्यक्तीचे प्रेत शवविच्छद करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस करीत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top