Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आत्महत्या केलेल्या महिला व इसमाची वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम सुरूच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आत्महत्या केलेल्या महिला व इसमाची वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम सुरूच आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगा...
आत्महत्या केलेल्या महिला व इसमाची वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम सुरूच
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी -
ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील विक्की चिकनकार या युवकाने 18 जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान हरदोली गावाजवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर नागभिड येथील लता डोईजड या महिलेने ब्रह्मपुरी-आरमोरी रोडवरील वैनगंगा नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शोधण्यासाठी बचाव पथकाला प्राचारण करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने मृतदेह शोधणयासाठी वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र अद्यापही बचाव पथकाला यश आले नाही.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top