Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वर्धा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांना मिळाला दिलासा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वर्धा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांना मिळाला दिलासा  महाराष्ट्र-तेलंगाना मार्ग 4 दिवसांनी झाला सुरू  आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क रा...
वर्धा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांना मिळाला दिलासा 
महाराष्ट्र-तेलंगाना मार्ग 4 दिवसांनी झाला सुरू 
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीची पाणीपातळी घटल्याने रविवारी सकाळी ९.४५ वाजल्यापासून महाराष्ट्र-तेलंगाना महामार्गावर वाहनांची ये-जा सुरू झाली. पुरामुळे रस्ता चार दिवस बंद होता. सकाळी शासकीय अधिकारी, पोलिस दल आणि कंत्राटदार जीआरआय लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून पुलावरील कचरा, माती हटवल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात करण्यात आली. वाहनांच्या रांगा एवढ्या लांब होत्या की वाहतूक सुरू झाल्यानंतर तब्बल ४ तास वाहने जात राहिली. यावेळी राजुरा एसडीपीओ राजा पवार, तहसीलदार हरीश गाडे, ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, जीआरआय लि. कंपनीचे अधिकार निर्मल उपस्थित होते.

ट्रकचालकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप
निवारी दुपारी चारच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावरून वाहून जाणारे पाणी ओसरले होते. त्यावेळी अधिकारी तातडीने मार्ग मोकळा करून आवश्यक ती कार्यवाही करतील, अशी अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या दिवशी रविवारी पुन्हा पुलाची पाहणी करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सुमारे 12 तास विलंबाने वाहतूक सुरू झाली. त्यामुळे ट्रकचालकांमध्ये प्रशासनाप्रती नाराजी दिसून आली. 

सास्ती मार्गा वरून बसेस झाल्या सुरु 
वर्धा नदीची पाणीपातळी कमी झाल्यानंतर रविवारी सकाळपासून राजुराबल्लारपूर दरम्यान वाहनांची वाहतूक सुरू झाली. पण पूल दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आधी ट्रकांना काढावे लागले. पोलिसांनी अगोदर ट्रकांना ट्रक बाहेर काढण्यास सुरुवात केली, सर्वच ट्रक काढायला तब्बल ४ तास लागले. दरम्यान, राजुरा बल्लारपूर दरम्यान जाणाऱ्या बसेस राजुरा सास्ती-बल्लारपूर मार्गे वळवण्यात आल्या होत्या. यावेळी प्रवाशांकडून राजुरा-बल्लारपूर साठी 15 ऐवजी 25 रुपये आणि राजुरा-चंदपूरसाठी 40 ऐवजी 50 रुपये आकारण्यात आले. 

तांत्रिक तपासणी शिवाय मंजुरी देणे धोकादायक
16 जुलै रोजी सायंकाळी वर्धा नदीचे पाणी पुला खालून 2 फूट खाली वाहत होते. मात्र तांत्रिक तपासणी न करता पूर्णपणे पूल उघडणे धोकादायक होऊ शकते, कारण पुलावरून 50 ते 60 टन वजनाचे ट्रेलर जातात. पाणी 7-8 फूट खाली गेल्यानंतर पुलाच्या पिल्लरचे खांब तपासल्या गेले. त्यामुळे शनिवारीच पुलावरील कचरा साफ केल्यानंतर रविवारी तांत्रिक तपासणी केल्यानंतर सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. रेलिंग काढण्याचे पत्र कंत्राटदार कंपनीला दिले होते. मात्र पुराच्या वेळी रेलिंग काढण्यात आले नाही. यादरम्यान महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी पुलाची पाहणी करत भेट दिली. अशी माहिती संबंधित विभागाद्वारे देण्यात आली. 

पुलावरील रेलिंग काढण्यात आली नाही
नागपूर-चंद्रपूर महामार्ग क्रमांक NH-930 आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आहे. मात्र पुरापूर्वी किंवा नंतर घ्यायची खबरदारी या विभागाने घेतली नाही. नियमानुसार पुलाचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून पुलाला लावलेले लोखंडी रेलिंग पावसाळ्यापूर्वी 7 जून रोजी काढावे लागतात. परंतु महामार्गाच्या पुलावरील लोखंडी रेलिंग काढण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही पाऊले उचलली नाही. त्यामुळे पुलावर झाडे, लाकूड, माती मोठ्या प्रमाणात अडकली होती. त्यामुळे पुलाच्या साफसफाईला बराच वेळ लागला. नदीचे पाणी ओसरल्यानंतरही 12 तास पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू होऊ शकली नव्हती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top