Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस नर्मदेत कोसळली 13 जणांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस नर्मदेत कोसळली 13 जणांचा मृत्यू बसमधील अनेक प्रवासी बेपत्ता 15 जणांना वाचवण्यात यश आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क ...
महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस नर्मदेत कोसळली 13 जणांचा मृत्यू
बसमधील अनेक प्रवासी बेपत्ता
15 जणांना वाचवण्यात यश
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
धार -
महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू आहे. प्रवाशांनी भरलेली बस सोमवारी सकाळी 10 वाजता नर्मदा नदीत कोसळली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. बसमधील अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंदोरहून जळगावला निघालेल्या बसला धार परिसराच्या नर्मदा नदीपात्रात मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नदीचे कठडे तोडून एसटी बस पुलावरून थेट नदीमध्ये कोसळली आहे. बसमधील तेरा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर अनेक जण बेपत्ता आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महामंडळाची ही बस क्र. एमएच 9848 हि बस सकाळी 7.30 च्या सुमारास मध्यप्रदेशातील इंदोरहून अमळनेरकडे निघाली होती. मात्र बस कशी नदीत कोसळली याबाबद्दल जास्त माहिती मिळू सकाळी नाही. बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही. अपघातग्रस्त बसमध्ये महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नसून, एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळेमधून अधिकारी पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. एसटी बसच्या अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे आदेश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top