आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राजुरा येथे रविवारी सकाळी राष्ट्रध्वज रॅली काढण्यात आली. रॅलीत लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्यांच्या घोषणांनी शहर दुमदुमले. या रॅलीत साची काकडे, मुग्धा मुसळे, पाकी जाधव, आराध्या माडुरवार ही लहान मुले सहभागी झाली होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने राजुरा येथे राष्ट्रीय ध्वज अमृत महोत्सव जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजुरा पोलीस प्रशासन, व्यापारी संघटना, फ्रेंच स्पोर्टिंग क्लब, मॉर्निंग क्रिकेट क्लब यांनी सहभाग घेतला. ही बाईक रॅली पोलीस ठाण्यापासून तहसील कार्यालयापासून शासकीय विश्रामगृह, संविधान चौक, भारत माता चौक, गांधी चौक मार्गे पोलीस ठाण्याच्या मैदानावर काढण्यात आली. पोलीस स्टेशन जवळ विसर्जित झाली. बाइक रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपचे जेष्ठ नेते सतीश धोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, सचिव संतोष रामगिरवार, डॉ.अशोक जाधव, डॉ.राज काटवारे, पी.यू. बोंडे, नरेंद्र काकडे, दिनेश अकनूरवार, किरण धुमणे, मिलिंद देशकर, प्रकाश चांडक, शंकर झंवर, छोटू सोमलकर, पूनम शर्मा, समीर बाबवानी, हरभजनसिंग भट्टी, रुपेश जैन, कमल बजाज, किरण ढुमणे, दिनकर आकनुरवार आदी सहभागी झाले होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.