Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून नाबार्ड स्थापना दिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून नाबार्ड स्थापना दिवस साजरा श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी  चंद्रपूर - विदर्भ कोकण ग्रामीण बँक ...
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून नाबार्ड स्थापना दिवस साजरा
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा तुकूमच्या माध्यमातून ज्ञानज्योती सभागृह दुर्गापूर येथे नाबार्ड स्थापना दिवसानिमित्त महिला मेळाव्याचे अजून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी जिल्हा अग्रणी बँकेचे एलडीएम प्रशांत धोंगळे, नाबार्डचे डीडीएम तृणाल फुलझेले, शाखा व्यवस्थापक सतीश वऱ्हाडे, नवदृष्टि संस्थेचे संचालक निलेश देवतळे, अक्षय देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रशांत धोंगळे यांनी महिलांना बँकेत खाते तयार करणे, बचत गटातून व्यवसाय तयार करणे, डिजिटल युगात व्यवहार करताना जागरूकता बाळगावी असे मत व्यक्त केले. याप्रसंगी तृणाल फुलझेले स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व नाबार्ड स्थापनेचा उद्देश, नाबार्डद्वारा राबविण्यात येणार विविध उपक्रम, SHG, JLG व विविध योजनांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून नाबार्ड स्थापना दिवसानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात बोलताना ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक सतिश वऱ्हाडे म्हणाले की महिलांच्या सबलीकरणावर बँकेने विशेष भर दिला असून बँकेच्या अनेक योजना महिलांचे जीवनमान उंचावणारे आहे. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून अटल पेन्शन, जीवन ज्योती, सामाजिक विमा आदी योजना राबवल्या जातात. बँकेच्या विविध योजनेतून महिलांना कर्ज दिला जातो. स्वयंरोजगारासाठी महिलांना कर्ज पुरवठा केला जातो. बँकेच्या योजनातून महिलांचा विकास शक्य असल्याने महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान शाखा व्यवस्थापक सतिश वऱ्हाडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश देवतळे, संचालन शिल्पा पागडे तर आभार मंगला घटे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी हेमा पागडे, अरुणा खोब्रागडे, अक्षय देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top