आमचा विदर्भ - ब्यूरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक व नगर परिषद राजुरा च्या संयुक्त विद्यमाने एकल प्रयोग प्लॅस्टिक बंदी अभियान व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून एकल प्रयोग प्लॅस्टिक वापरण्यावर पूर्णतः बंदी घातली, आणि असे प्लॅस्टिक वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा तरतूद केली आहे.
प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पावसाच्या पाण्यासोबत हे प्लॅस्टिक समुद्रात जाऊन समुद्री जीव धोक्यात येत आहे. प्लॅस्टिक चे विघटन होणे कठीण असून यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे, हे सर्व टाळायचे असेल तर आपल्याला एकल प्रयोग प्लॅस्टिकला आपल्या दैनंदिन वापरातून हद्दपार करावे लागेल असे प्रतिपादन आपल्या भाषणातून शाहबाज खान यांनी केले...
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ आर आर खेरानी यांनी प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम सांगितले, कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी यांनी आपल्या प्रास्ताविकातून एकल प्रयोग प्लॅस्टिक बंदी बाबत आणि जनजागृती बाबत राष्ट्रीय सेवा योजना पथक मागील चार वर्षांपासून करत असलेल्या कार्याची माहिती दिली.
या व्याख्यानास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर आर खेरानी, मार्गदर्शक म्हणून शाहबाज खान, पर्यवेक्षक, कचरा व्यवस्थापन विभाग नगर परिषद राजुरा, प्रा. गुरुदास बलकी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ सारिका साबळे, प्रा. प्रवीण पाचभाई उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बंडू मालेकर, प्रा. मलिक काझी, स्वयंसेवक आकाश रामटेके आणि प्रतीक्षा वासनिक यांनी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.