Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुपोषित बालकांना बाळूच्या माध्यमातून पोषण आहार किटचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कुपोषित बालकांना बाळूच्या माध्यमातून पोषण आहार किटचे वितरण लांडे कुटुंबीयांनी नातवाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी जोपासली सामाजिक बांधिलकी आमचा ...
कुपोषित बालकांना बाळूच्या माध्यमातून पोषण आहार किटचे वितरण
लांडे कुटुंबीयांनी नातवाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी जोपासली सामाजिक बांधिलकी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रणी जणसेवेचा वसा घेतलेली बाळू फाउंडेशनच्या संकल्पनेतून सास्ती-रामपूर येथील नागरिक सौ. माधुरी रमेश पाटील लांडे  यांच्या नातवाच्या नामकरण सोहळा प्रसंगी व स्वर्गीय सौ. ताराबाई शिवराम पाटील लांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांचेकडून दिनांक 11जुलै 2022 ला राजुरा येथील ओम साईराम मंगल कार्यालयात 10 कुपोषित बालकांना बाळू पोषण आहाराची भेट देण्यात आली सौ. महेश्वरी सुमित आवारी यांच्या मुलाचे नामकरण सोहळा या प्रसंगी सुमित आवारी, रमेश लांडे, सौ. शारदा आवारी, सुभाष आवारी, सौ.सविता ढुमणे, नथ्थुजी ढुमणे, द्रोपती तोतडे, अमित मेश्राम, CDPO अक्षय सुर्तेकर, बाळू कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बाळूचे संस्थापक अमित महाजनवार यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारे आहे असे प्रतिपादान केले. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top