Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नोकरी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजय चा अद्याप लागला नाही शोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नोकरी  येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजय चा अद्याप लागला नाही शोध धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी  गडचांदूर - अमलनाला धर...
नोकरी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजय चा अद्याप लागला नाही शोध
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
गडचांदूर -
अमलनाला धरणाजवळ असलेल्या नौकारी येथील संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष हा व्यक्ती दिनांक 10 जुलै रोजी सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंस) ता.राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला व नाल्याच्या दोन्ही बाजुने अमलनाला धरणा पर्यंत व धरणात शोध घेतला असता कुठेच आढळून आला नाही व शोध घेण्यासाठी दि. 11 जुलै ला नोकारी बु. व अमलणाला धरण येथे चंद्रपूर येथील पोलीस विभागाचे शोध पथक  दाखल झाले व शोध घेतला असता त्याना सुध्दा या शोधकार्यात यश आले नाही व पावसाचे व पुराचे वाढते प्रमाण पाहता शोध घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. परिवारातील बहीण भाऊ जावई व ग्रामस्थ मित्र शोध घेत आहे. परिसरात कुठेही आढळून आल्यास पोलीस स्टेशन गडचांदूर व त्यांच्या नातेवाईकास संपर्क करावा आणी पाण्याचा प्रवाह  धोकादायक पातळीवर आहे असे असताना नाला नदी,रस्ता ओलांडू नये व पाण्यात  ऊतरुन सेल्फी,फोटो काढण्याचा प्रयत्न  व मजा मस्ती करु नये जीवन आपल्यासाठी  व परिवारासाठी अमूल्य  आहे असे आवाहन करण्यात आले आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top