पोलिसांच्या रूपात देवदूतांनी वाचविले प्रवाश्यांचे प्राण
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
हैदराबाद वरून चिंचोली विरुर मार्गे छत्तीसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यात अडकल्याने प्रवाश्याचा जीव टांगणीला लागला होता, मात्र विरुर पोलिसांना या बद्दल माहिती मिळताच लगेच मदत करीत मोठ्या परिश्रमातून सर्व प्रवाशांना बाहेर सुखरूप काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तेलंगणात कामासाठी गेलेले मजूर परत आपल्या छत्तीसगड राज्यात खाजगी ट्रॅव्हल्स क्रं. MP-50 P-1116 ने निघाले तेलंगणातील शिरपूर मार्गे चिंचोली-विरुर मार्गे येत असताना चिंचोली नाल्यातील पुलावर पाण्याचा अंदाज न घेता चालकाने ट्रॅव्हल्स टाकली आणि त्यात ट्रॅव्हल्स फसली सगळीकडे पाणीच पाणी असल्याने प्रवाश्यांची जीव वाचविण्याची घडपळ सुरु झाली. एकाने पोलिसांच्या 12 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. विरुर पोलिसांना संदेश आला आणि क्षणाचाही वेळ न लावता सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आणि पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली. काही ग्रामस्थाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने जीव धोक्यात घालून बस मधील 25 लहान बालकासह पुरुष महिला प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढले लगेच त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.