Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलिच्या कोळसा खाणीत डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वेकोलिच्या कोळसा खाणीत डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने 300 लिटर डिझेल जप्त विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...
वेकोलिच्या कोळसा खाणीत डिझेल चोरट्यांचा सुळसुळाट
सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने 300 लिटर डिझेल जप्त
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा - 
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील कोळसा खाणीत दररोज हजारो लिटर डिझेलची चोरी होत असून वेकोलि क्षेत्रातून अवैध कोळसा, सुटे पार्ट्स, भंगार साहित्य यांच्या चोरीकडे वेकोलि प्रशासन गंभीरतेने घेत नसल्यामुळे चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.
गोवरी 2 या कोळसा खाण क्षेत्रात काल रात्रौ दहा वाजताच्या सुमारास जात असलेला डिझेल चोरांचा ताफा MSF जवान व वेकोलि सुरक्षा कर्मचारी अंकुश गोरे यांनी रोकला, त्या ताफ्याकडून डिझेलने भरलेल्या सात कॅन जप्त करण्यात आल्या. 
Honda Activa या वाहनाने डिझेल चोरून नेत असताना अंकुश गोरे सुरक्षा कर्मी यांना भ्रमणध्वनी आला त्यात नुकताच तयार झालेल्या मार्गावर डिझेल भरलेल्या तीन कॅन आढळून आल्या. लगेच अंकुश गोरे व मंगेश पवार यांनी खान परिसरात पाहणी केली असता तिथे दोन जण आपल्या दुचाकीवर डिझेल ने भरलेल्या दोन कॅन घेऊन पसार झाले. गोवरी 1 क्षेत्रात नवनाथ यांनी तपासणी ली असता डिझेल ने भरलेल्या सात कॅन आढळून आल्या. सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेने आणि सतर्कतेने जवळपास 300 लिटर डिझेलजप्त करण्यात आले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top