Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुसळधार पावसाने वरुर-विरूर मार्ग ८ तास बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुसळधार पावसाने वरुर-विरूर मार्ग ८ तास बंद अनेक शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसला मुसळधार पावसाचा फटका दुबार पेरणी केलेली पिकेही आली पाण्याखाली ...
मुसळधार पावसाने वरुर-विरूर मार्ग ८ तास बंद
अनेक शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसला मुसळधार पावसाचा फटका
दुबार पेरणी केलेली पिकेही आली पाण्याखाली 
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
आज सकाळी जवळपास चार तास पडलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातल्याने वरुर ते विरूर मार्ग जवळपास आठ तास बंद होता. वरुर ते विरूर मार्गावरील सिर्सी आणि चिचबोडी येथील नाले पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने पाणी सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत रस्त्यावरून वाहत असल्याने जवळपास हा मार्ग ८ तास बंद होता. सिर्सी नाल्याजवळील शाळकरी विद्यार्थ्यांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला. काही विद्यार्थी काठावर उभे राहून सेल्फी काढताना सुद्धा दिसून आलेत. राजुरा तालुक्यातील वरुर, विरूर, सोंडो, लक्कडकोट, डोंगरगाव, सुब्बई आणि सर्वसुर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी दिली. काल सिंधी-धानोरा आणि विरूर-अंतरंगाव-अन्नूर हा मार्ग बंद होता आता पाणी उतरल्याने हाही मार्ग सुरु झाला आहे. 

दुबार पेरणी केलेली पिकेही आली पाण्याखाली
निसर्गाच्या लहरीपणाचा कायम फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अधिकतर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेऊन पेरण्या उरकत्या घेतल्या. मात्र, पेरणी होताच सुरु झालेला मुसळधार पावसाने नदी नाल्याकाठच्या शेतीचे जबर नुकसान केले. पूर उतरताच पुन्हा शेतकऱ्यांनी कसेतरी करून पेरण्या उरकावल्या मात्र काल पासून या क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने नाल्याकाठचा शेती पाण्याखाली आल्याने येथील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. 

दुबारमुळे होणार दुहेरी नुकसान
अधिकच्या पावसामुळे जर दुबार पेरणीचे संकट ओढावले तर मात्र शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. यंदा बी-बियाणांसह खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी पुन्हा अधिकच्या किंमतीने बियाणांसाठी खर्च करावा लागणार. शिवाय बाजारपेठेत बियाणे उपलब्ध होणार की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आगोदरच खरिपाच्या पेरण्यांना उशीर झालेला आहे. 15 जुलैपर्यंत पेरण्या झाल्या तर सरासरी एवढे उत्पादन मिळते असा अंदाज आहे. मात्र आता दुबार पेरणीसाठी पावसामुळे उशीर झाला तर खर्च करुनही काय उपयोग होणार कि नाही अश्या विवंचनेत शेतकरी पडला आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top