Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून बालवाडी चे उद्घाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून बालवाडी चे उद्घाटन धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - मुलांना शाळेचे वळण लागावे ...
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन कडून बालवाडी चे उद्घाटन
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मुलांना शाळेचे वळण लागावे तसेच त्यांना योग्य वाढ होण्यासाठी पोष्टीक आहार मिळावा याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर ने बीबी येथील कोविड मुळे बंद असलेली बालवाडी पुन्हा सुरू केली आहे. बालवाडी चे उद्घाटन सुधा श्रीराम मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिव्या शर्मा मॅडम, पल्लवी घोष मॅडम यांची उपस्थिती होती.
यावेळेस सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व मुलांना बिस्किट व चिक्की यांचे वाटप करण्यात आली व मार्गदर्शनात सर्व मुलांना सुधा श्रीराम मॅडम यांच्या द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात सी.एस.आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, डॉक्टर गोदावरी नवलानी, संजय ठाकरे, देविदास मांदाडे व बालवाडी शिक्षिका विद्या कारवटकर मँडम, हेल्पर रजीया शेख यांची उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top