जेष्ठ नागरिकांना बसत आहे आर्थिक फटका
एच.एन. (राजेश) अरोरा प्रतिनिधी
बल्लारपूर -
कोरोना संकटाच्या काळात सर्व रेल्वे वाहतूक सेवा बंद करण्याबरोबरच सर्व सुविधाही बंद होत्या. कोरोनाचे संकट आता जवळजवळ संपले आहे. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्यांचे संचालनही नियमित होऊ लागले आहे. यापूर्वी बंद असलेल्या सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत रेल्वे बोर्डाने वरिष्ठांना दिलेली रेल्वे तिकिटातील सवलतही पूर्वीप्रमाणेच सुरू न केल्याने कित्येक ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात सर्व काही बंद होते पण आता सर्व बंद सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत, पॅसेंजर ट्रेनऐवजी मेमू ट्रेन चालवली जात आहे. प्रवाशांना जनरल तिकीटही मिळू लागले आहे. मग ज्येष्ठ नागरिकांप्रती एवढी असहिष्णुता का? बहुतांश ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतनधारक आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अशा स्थितीत त्यांना दीर्घकाळ प्रवास करावा लागला. यात्रेला जावे लागले, तर त्यांच्यापुढे आर्थिक संकट निर्माण होते. कोरोना संकटापूर्वी सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे बोर्डाकडून रेल्वे प्रवासाच्या तिकिटात सवलत दिली जात होती, त्याचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिक घेत होते. मात्र आता रेल्वे सेवा सुरळित होत आहे. यानंतरही ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली रेल्वे प्रवास सवलत सुरू करण्यात आली नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याउलट मात्र 19 मार्च पर्यंतच्या सर्व सवलती 20 मार्च 2020 पासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यापैकी विद्यार्थी, दिव्यांग आणि रुग्णांसाठी ही सुविधा सुरू आहे. यासंदर्भात श्रीनिवास सुंचुवार यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, रेल्वेतील सर्व ज्येष्ठ अधिकारी यांना पत्र पाठवून ज्येष्ठ नागरिकांचा प्रती संवेदना व्यक्त करण्याची मागणी केली आहे.
ज्येष्ठांना द्यावा आर्थिक दिलासा
ज्याप्रमाणे रेल्वे बोर्ड कोरोनाच्या संकटात बंद झालेल्या सेवा प्रथम प्राधान्याने सुरू करत आहे. तेसच ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली तिकीट सवलत पूर्ववत करून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक त्रासातून दिलासा द्यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रेल्वे अधिकारी म्हणतात, सवलत देणे धोरणात्मक बाब!
झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांना मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक, कृष्णाथ पाटील यांच्याकडून एक उत्तर प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर सवलत देणे ही रेल्वे बोर्डाच्या अंतर्गत धोरणात्मक बाब आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांमध्ये दिलेली सवलत पूर्ववत करावी.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.