शासनाला लक्षावधीचा फटका
कोट्यवधींची खनिज संपतींची राजरोसपणे लूट..!!
तस्करांनी अक्खा माणिकगड पहाड विकायचा जणू ठेकाच घेतला
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
मध्य चांदा वनविभागातंर्गत येणाऱ्या गडचांदूर परीक्षेत्रात सध्या अवैध उत्खननाने डोके वर काढले आहे. येथील तस्करांशी कथितरित्या वनकर्मचार्यांनी हातमिळवणी केल्याने शासनाला लक्षावधीचा फटका बसल्याचे उजेडात आले आहे.
गडचांदूर परीक्षेत्रातील घोडामगुडा, नैतामगुडा, अमलनाला परिसरात सद्या तस्करांनी आपले बस्तान मांडले असून किमान 18 ते 20 ट्रॅकटर द्वारा रोज हजारो ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून राजरोस वाहतूक सुरू आहे.
महसूल आणि वन कर्मचाऱ्यांना कथिततरीत्या हाताशी धरून तस्करांनी अक्खा माणिकगड पहाड पोखरायचा जणू ठेका घेतल्याचे दृष्टीस पडते. या अवैध खनिजांची प्रति ट्रॅक्टर 1हजार 700 रुपयात गडचांदूर आणि परिसरात विक्री केली जात आहे. खाबूगिरीला चटावलेले गडचांदूर चे वनकर्मचारी याकडे कानाडोळा करून वसुली आणि कोंबडीत मश्गुल आल्याचा आरोप आहे.
या संदर्भात गडचांदूर नगर परिषदेचे नगरसेवक शेख सरवरभाई यांनी उप वनसंरक्षक चांदा यांना निवेदनासह सुरू असलेल्या अवैध उत्खननाचे फोटो आणि व्हिडीओ शुटींग पाठवली असून वरीष्ठ वनाधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.