Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पुरात वाहुन गेलेल्या परिवारास शासनाने केली 4 लाख रुपयांची मदत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुरात वाहुन गेलेल्या परिवारास शासनाने केली 4 लाख रुपयांची मदत मृत व्यक्तीच्या परिवाराने मानले शासन आणि गावकऱ्यांचे आभार धनराजसिंह शेखावत - आ...
पुरात वाहुन गेलेल्या परिवारास शासनाने केली 4 लाख रुपयांची मदत
मृत व्यक्तीच्या परिवाराने मानले शासन आणि गावकऱ्यांचे आभार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
अमलनाला धरणाजवळ असलेल्या नौकारी (बु) येथील स्व.संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष हा व्यक्ती दिनांक 10 जुलै ला सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंनस) ता.राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला होता व शोध घेतला असता 13 जुलै ला मृतदेह अमलणाला धरण येथे तरंगताना आढळून आला होता
मयताच्या परिवाराला शासनाच्या वतीने आर्थिक साहाय्यताचा 4 लक्ष रुपयांचा धनादेश मा. हरीश गाडे, तहसीलदार राजुरा यांनी नोकारी बु.(गोवारीगुडा) येथे 19 जुलै ला मयत संजय/संजीत यांचे परिवाराची भेट घेऊन देण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी साळवे, तलाठी ईसापुर वडस्कर , नोकारी बु चे माजी उपसरपंच वामन तुरानकर, पो.पाटील नोकारी बु. राकेश भगत, ईसापुर चे कोतवाल, रमेश नैताम हे उपस्थित होते. मयताचा परिवार दुखात असताना मा. तहसीलदार यांनी व महसुल विभागाचे कर्मचारी, पोलीस स्टेशन गडचांदूर, पो.स्टेशन चंद्रपूर शोध पथक, पत्रकार प्रा. अशोक डोईफोडे, ग्रामस्थानी केलेले सहकार्य अमूल्य आहे व वामन तुरानकर, माजी उपसरपंच यानी केलेला पाठपुरावा व मदत यामुळे सर्व शक्य झाले असे मत व्यक्त करण्यात आले. वाहून गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराने शासनाचे व ग्रामवासियांचे आभार मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top