Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जुन्या प्रकरणात तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जुन्या प्रकरणात तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - तालुक्यातील वरूर रोड येथील तलाठी...
जुन्या प्रकरणात तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
तालुक्यातील वरूर रोड येथील तलाठी विनोद गेडाम यांना लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आज दिनांक 19 जुलैला सायंकाळी 6 वाजता राजुरा येथील शिवाजी नगर येथील निवासस्थानी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी ही कारवाई केली. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
विनोद गेडाम हे वरूर रोड येथे तलाठी म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या कामाबद्दल अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. या प्रकरणातील तक्रारदार तालुक्यातील वरूर रोड येथील रेती पुरवठा व्यावसायिक असून त्यांचा रेतीचा ट्रक दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी तलाठी विनोद गेडाम यांनी पकडला होता. त्यावेळी विनोद गेडाम यांनी 70 हजार रुपयांची मागणी तक्रारदारास केली होती. मात्र त्यावेळी गेडाम यांनी 35 हजार रुपये घेऊन ट्रक सोडून दिला होता. यानंतर उरलेले 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर पुन्हा बाकी राहिलेल्या 35 हजार रुपयांची मागणी तलाठी गेडाम यांनी केली. यावर तडजोड होऊन 25 हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात वरूर येथील 45 वर्षीय तक्रारदाराने चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली आणि या प्रकरणी 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राजुरा येथील शिवाजी वॉर्डातील रहिवाशी तलाठी विनोद गेडाम यांच्या घरी पकडण्यात आले. आरोपी तलाठी विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार आरोपीने ही रक्कम स्वीकारली नाही. या प्रकरणी तक्रारदार पोलीस विभागाचे अधिकारी झाले आहेत.
ही कारवाई नागपुर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस कर्मचारी नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, संदेश वाघमारे, मेघा मोहुर्ले, सतिश सिडाम यांच्या पथकाने केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top