समाज माध्यमाच्या वायरल ने लहान मुलाला मिळाले आई-वडील
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदुर येथील वॉर्ड नं. 5 येथे किरायाने राहात असलेल्या गृहस्थाचा मूकबधिर मुलगा हरविला होता. घरा पासुन दुर असलेल्या गांधी चौकात तो रडत होता. तेथील काही नागरिकांनी ही माहिती गडचांदुर पोलिसांना दिली. तत्काळ पोलिसांनी ठाण्यात घेवुन येवुन आपलेच सामाजिक दायित्व निभावले. ही बातमी वाऱ्या सारखी पसरली पोलिसांच्या सामाजिक दायित्वाने व समाज माध्यमाच्या प्रसाराने अखेर त्या मुलाचे आई वडील मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार एक लहान मुलगा साधारण एक ते दिड वर्षाचा मुलगा खेळता खेळता गांधी चौकात आला. चालता येत होते परंतु बोलता येत नसल्याने आता आपण कुठे व कसे जावे त्याला सुचेनासे झाल्याने तो रडत होता. उपस्थित लोकांनी बराच प्रयत्न केला परंतू घर व वडीलाचे नाव न समजल्याने अखेर ही माहिती पोलिसाना कळविली. माहिती मिळताच पोलिसानी येवुन त्या मुलाला पोलीस ठाण्यात घेवुन येवुन सामजिक दायित्व निभावले. ही बातमी समाज माध्यमातून मुलाच्या फोटो सह गडचांदुरात पसरली. पोलिसांच्या मदतीने व समाज माध्यमातून व शरण सा मिल चे संचालक राजू सचदेव सहकार्याने अखेर त्या लहान मुलाचे आई वडील मिळाले. आई वडीलानी पोलिस प्रशासनाचे, समाज माध्यमाचे ज्यानी-ज्यानी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रित्या मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.