वाढत्या महागाईचा केला निषेध
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' चा नारा देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील काही वर्षांत सातत्याने जीवनावश्यक व मुलभूत गरजा असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ करून जनसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. येत्या १८ तारखेपासून गृहिणींना स्वयंपाकात उपयोगी अन्नधान्य, कणीक, डाळ, दुग्धजन्य पदार्थ यावर ५%जी.एस.टी लादली जाणार असून यामुळे गृहीणींचे कौटुंबिक बजेट पुर्णपणे बिघडणार आहे. त्यामुळे ही जी.एस.टी वाढ आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे, चंद्रपूर जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर आणि लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कमी करण्यासाठी आवाहन करणारे पत्रे पाठवली आहेत.
या प्रसंगी राजुरा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी जिप सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, अर्चना गर्गेलवार, योगिता भोयर, पुनम गिरसाळवे, ज्योती शेंडे, हिना शेख, निता बानकर, रेखा बोढे यासह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.