![]() |
(संग्रहित छायाचित्र) |
पांढरपोवनी येथील २३ वर्षीय युवकाने वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारून केली आत्महत्या
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
पांढरपोवनी येथील एका २३ वर्षीय युवकाने वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारत २९ जूनच्या मध्यरात्री आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली आहे. अल्पेश लोचन व्याहाडकर वय २३ रा. पांढरपोवनी असे मृतकाचे नाव असून सदर युवकाने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळू शकले नाही.
३० जूनला पोलिसांनी वर्धा नदी परिसरात शोध मोहीम राबविली असता दुपारच्या सुमारास पोलीस कर्मचारी अशोक गर्गेलवार, अशोक मत्ते, वामन नक्षीने, दिलीप चव्हाण, गिरीश मरापे, अजित वाहे, सुजित मोगरे व अतुल सहारे यांना अल्पेशचा मृतदेह आढळला.
अल्पेशच्या मृतदेह बघताच त्याचा वडिलांना व कुटूंबियांना रडू कोसळले. अवघ्या २३ वर्षाचा मुलगा असं पाऊल उचलणार याबाबत कुणालाही कल्पना नव्हती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.