Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सेवानिवृत्त शिक्षक बंडु धोटे यांना प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सेवानिवृत्त शिक्षक बंडु धोटे यांना प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - महात्मा गांधी विद्या...
सेवानिवृत्त शिक्षक बंडु धोटे यांना प्रदीर्घ सेवेनंतर भावपूर्ण निरोप
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील जेष्ठ शिक्षक बंडु धोटे प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून ला सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेच्या वतीने त्याना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
निरोप व सत्कार समारंभचा अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, संचालक विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ. स्मिताताई चिताडे, उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच.बी. मस्की, एमसीव्हीसी विभागाचे प्रमुख प्रा.अशोक डोईफोडे होते.
34 वर्षे प्रदीर्घ सेवा केल्या नंतर सेवानिवृत्त झालेले बंडु धोटे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी लता घाटे, वैशाली हेपट, संजय पोगुलवार यांनी बंडु धोटे यांच्या कार्याची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांनी बंडु धोटे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची प्रशंसा करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. बंडु धोटे यांनी सत्काराला उत्तर देताना शाळा व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संचालन पर्यवेक्षक एच. बी. मस्की यांनी केले तर आभार तुकाराम धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top